अफिलिएट मार्केटींग म्हणजे काय ? | Member Promoting Importance In Marathi 2023

Digital marketing news
0

एका रुपयाची देखिल गुंतवणूक न करता भरपुर पैसे मिळवून देणाऱ्या एखाद्या व्यवसायाच्या शोधात आपण आहात का ? आज आपण अश्याच एका बिझनेसबद्दल बोलणार आहोत ज्याचं नाव आहे अफिलिएट मार्केटिंग. अफिलिएट मार्केटींग म्हणजे काय? ( Member Promoting Importance In Marathi ) हे पपाहूया


या अफिलिएट मार्केटींग मध्ये आपण खिशातला एक रुपयाही खर्ची ना घालता लाखो रूपयांचे समान ऑनलाईन विकू शकतो आणि त्यातून महिन्याला हजारो रूपये कमावू शकतो.


बऱ्याच लोकांना हे अफिलिएट मार्केटींग चैन मार्केटींग सारखं वाटते किंवा काही लोक तर याला फसवणूक किंवा फ्रॉड देखील समजत असतात परंतु तसे नाहीये. जर हे अफिलिएट मार्केटींग थोडक्यात अभ्यास केला किंवा थोडीफार हुशारी घेऊन यातून ऑनलाईन पैसे आपण कमावू शकतो. फक्त त्यासाठी याबद्दलची पूर्ण माहिती असणे आवश्यक आहे.

अफिलिएट मार्केटींग म्हणजे काय ? | Member Promoting Importance In Marathi 2023,affiliate marketing, how to do affiliate marketing, affiliate marketing 2023, affiliate marketing meaning in english, affiliate marketing examples,
Affiliate Marketing Meaning In Marathi 2023

तर हे अफिलिएट मार्केटींग म्हणजे काय असते ? यामध्ये कसे काम करायचे असते ? कशाप्रकारे आपण यातून पैसे कमावू शकतो? आणि खरंच लोक यातून लाखो रुपये कमवत आहेत का? या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेऊयात.


आजकाल आपण कोणतीही गोष्ट खरेदी करण्यापूर्वी त्याबद्दलची संपूर्ण माहिती ऑनलाईन पाहत असतो त्याबद्दल पूर्ण शहानिशा करूनच आपण ती गोष्ट खरेदी करण्याचा विचार करतो. त्यासाठी आपण आपल्या विश्वासातील युट्यूब चॅनल्स, वेबसाइट्स किंवा सोशल मीडिया अकाउंट्स वर जाऊन त्या गोष्टींबद्दलचे रिव्ह्यूज जाणून घेत असतो.


कंपनीच्या नजरेतून पाहायला गेलं तर प्रत्येक कंपनी आपले उत्पादन विकू इच्छित असते आणि त्यासाठी ते वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या ठराविक ग्राहकांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यासाठी ते टीव्ही, रेडिओ, न्यूजपेपर तसेच ऑनलाईन जाहिराती इत्यादी माध्यमांचा प्रभावी वापर करताना दिसून येतात.


अश्यातच जर काही ग्राहक असतील जे काही ठराविक युट्यूब चॅनल्स, वेबसाइट्स किंवा सोशल मीडिया अकाउंट्स वर विश्र्वास करत असतील तर या कंपन्या अशा ग्राहकांना टार्गेट करण्यासाठी अफिलिएट प्रोग्राम सुरु करून त्या प्रोग्रामला जॉईन होणाऱ्या लोकांच्या माध्यमातून वस्तूंची विक्री करवून त्या बदल्यात त्यांना टक्केवारीच्या स्वरूपात कमिशन देत असतात. अफिलिएट कमिशन म्हटले जाते.


बऱ्याच मोठमोठ्या कंपन्या आपापले अफिलिएट प्रोग्रॅम्स चालवत असतात. जर एखादा युट्यूबर, ब्लॉगर किंवा एखादा सोशल मिडिया वर कार्यरत असणाऱ्या व्यक्ती एखाद्या कंपनीच्या अफिलिएट प्रोग्राम मध्ये सामील होतो तेव्हा त्याला एक अफिलिएट अकाउंट उघडावे लागते.


त्यानंतर त्यांना जी वस्तू किंवा उत्पादन विकायचे असेल त्या प्रोडक्ट ची अफिलिएट लिंक मिळते. पुढे ती लिंक ला आपल्या यूट्यूब चॅनेलवर, आपल्या वेबसाईटवर किंवा आपल्या कोणत्याही सोशल मीडिया अकाउंट्स वर शेअर करतात.


शेअर केलेल्या लिंकवरून त्यांचे दर्शक आणि वाचक कोणतीही गोष्ट खरेदी करतात तेव्हा त्याच्या बदल्यात त्या अफिलिएट्सला ठराविक कमिशन दिले जाते. अफिलिएट मार्केटिंग करणाऱ्यांना अफिलिएट्स म्हटले जाते.


समजा आपण अमेझॉन.इन वर आपले अफिलिएट अकाउंट उघडले. आता आपणाला एका १०० रुपयांच्या वस्तूची विक्री करायची आहे आणि त्या वस्तूवर देण्यात येणारे अफिलिएट कमिशन हे १०% इतके आहे. तर आपण त्या वस्तूची लिंक आपल्या युट्यूब चॅनेलवर किंवा आपल्या ब्लॉगवर किंवा सोशल मीडियावर टाकली आणि त्यातून आपण एक विक्री घडवून आणली. तर आपणाला त्या १०० रुपयांच्या वस्तूवर १०% म्हणजे १० रुपये कमिशन मिळेल.


अशा प्रकारे आपण महिन्याभरात आपल्या अफिलिएट अकाउंट वरून किती वस्तूंची विक्री करतो त्यानुसार महिन्याला आपल्या अकाउंट मध्ये पैसे जमा होत जातील. ही रक्कम आपण गिफ्ट कार्ड च्या माध्यमातून किंवा थेट आपल्या बँक अकाउंट  जमा केल्या जाते.


यामध्ये कोण किती पैसे कमावू शकतो याला कोणतेही बंधन नाही. हे सगळे आपल्या अफिलिएट लिंक वर किती लोक भेट देतील म्हणजेच त्यावर किती ट्रॅफिक येईल यावर अवलंबून असते. शिवाय आपण त्या प्रॉडक्ट ची मार्केटींग कशी करतो त्यावर देखील हे अवलंबून असते. त्यामुळे यातून नेमका किती पैसा कमावला जाऊ शकतो हे निश्चित सांगणे कठीण आहे.


तरी देखील मेहनत करून आणि थोड डोकं लावून काम केलं की यातून आपण भरपूर ऑनलाईन पैसे कमावू शकतो. बरेच लोक यातून महिन्याला लाखो रुपये देखील कमावत आहेत.


जर आपल्याकडे चांगले मार्केटींग कौशल्य असेल तर आपण यातून भरघोस पैसे कमवू शकतो. कारण यामध्ये कसलीही मर्यादा नसते. आपण जेवढी मार्केटींग करू तेव�

Post a Comment

0 Comments
Post a Comment (0)